मुंबई

एमबीबीएस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ कोटी ३० लाखांचा गंडा, ५ जणांना अटक

नवी मुंबई – एमबीबीएस ऍडमिशनच्या नावाखाली अनेक गरजू विद्यार्थी व त्यांच्या पालकांची फसवणूक करत तब्बल ३ कोटी ३० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्जीय टोळीचा नेरुळ पोलिसांनी पर्द्गाफाश केला आहे. या प्रकरणी सौरभ कृष्णा उपाध्याय नोएडा उत्तरप्रदेश, इफ्तेखार अहमद मुस्ताक अहमद नोएडा उत्तरप्रदेश, लव अवधकिशोर गुप्ता जयपूर राजस्थान, आकिब नौशाद अहमद मालवीय नगर नवी दिल्ली, अभिजात्य राधेशाम सिंग गाजियाबाद उत्तरप्रदेश या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील विनोदनी यादव यांनी आपली मुलगी साक्षीला डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल युनिव्हर्सिटी नेरुळ येथे एमबीबीएसला ऍडमिशन देतो म्हणून डोनेशनच्या नावाखाली ३३ लाख ५० हजार लुटल्याची तक्रार नेरुळ पोलिस ठाण्यात दाखल केली होती. आरोपी अभय सिंग आणि त्याच्या साथीदारांनी डोनेशनच्या नावाखाली साडेतेहतीस लाख रुपये स्विकारले मात्र एडमिशन काही करून दिले नाही, वर डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल युनिव्हर्सिटीचे बनावट ऍडमीशन लेटर देऊन फसवणूक केली. याच प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०६, ४२०, ४६८, ४७१आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यामध्ये हव्या असलेल्या आरोपींना पोलिसांनी सापळा रचून वाशी रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. हे ठग वैदयकीय प्रवेशासाठी आवश्यक NEET परीक्षा दिलेल्या विदयार्थ्याचा डाटा मिळवत, विदयार्थी व पालकांना फोनद्वारे संपर्क करायचे. संपर्क साधत ते महाराष्ट्र मुंबईतील नामांकीत ग्रँट वैदयकीय महाविदयालय (सर जेजे), सायन वैदयकीय महाविदयालय, नायर वैदयकीय महाविदयालय, तसेच रायगड जिल्ह्यातील अलिबाग शासकीय वैदयकीय महाविदयालय, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील वैदयकीय महाविदयालय नेरुळ, तेरणा वैदयकीय महाविदयालय नेरुळ, एमजीएम वैदयकीय महाविदयालय, कामोठे, येथे प्रवेश मिळवुन देण्याचे आमिष दाखवायचे. इतकेच नाही तर या महाविद्यालयांमध्ये घेवून जात महाविदयालयाच्या बनावट लेटर हेडवर कॉलेजचा बनावट शिक्का मारून वैदयकीय प्रवेशाची खोटी कागदपत्रे द्यायचे.

तसेच कॉलेजच्या नावाचा बनावट ईमेल आयडी तयार करून त्यादवारे विदयार्थी व पालकांना ईमेल पाठवत व त्यांना DMER कार्यालय , मुंबई येथे घेवुन जावुन तेथे ओळख असल्याचे भासवुन विदयार्थी व पालकांकडुन आरोपी आपल्या विविध बँक खात्यामध्ये व रोख रक्कम स्वरूपात प्रवेशासाठी ठरलेली रक्कम घेवुन फसवणुक करायचे. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्या विरोधात मुंबईतील सर जे. जे. पोलीस ठाणे, माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे, अलिबाग पोलीस ठाणे, भंडारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४४१, ४०६, आणि ३४ प्रमाणे गुन्हे दाखल असून महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात या ठगांविरोधात तक्रार अर्ज आले असून त्यांची गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु आहे.

दरम्यान न्यायालयाने आरोपींना २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार सह आयुक्त संजय मोहिते, अप्पर पोलीस आयुक्त महेश घुर्ये, उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी भगत, संजय चव्हाण ( गुन्हे ) तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे आणि सत्यवान बिले यांनी कसोशीने तपास करत आरोपींना अटक केले. आरोपींकडून मोबाईल तसेच लॅपटॉप असा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment