पश्चिम महाराष्ट्र

3 महिन्यांपूर्वी मुलगी दगावली आणि आता मुलगा!

*काल पासून अंत्यसंस्कार केलं नाही
सोलापूर – बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दिव्यांग निधीसाठी सुरु असलेल्या उपोषणादरम्यान एका दाम्पत्यानं आपल्या मुलीला तीन महिन्यांपूर्वी गमावलं होतं. दरम्यान, आता याच दाम्पत्याच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. संभव रामचंद्र कुरळे(वय 10 वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होते आहे. दिव्यांग संघटनेच्या प्रहरच्या अध्यक्षा संजीवनी बरंगुळे यांनी न्याय मिळावा यासाठी स्वतः अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाच्या आणि त्याच्या बहिणीच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.मुलाच्या मृत्यूने सोलापूर प्रशासनही हादरुन गेलं आहे. दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिकका या मृत मुलाच्या आईवडिलांनी घेतली आहे.17 तास झाले अजूनही मृत मुलावर अंत्यसंस्कार केले नाही अशी भूमीका नातेवाईकांनी घेतली आहे.

*चिकर्डे गावात घडली घटना-
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मौजे चिखर्डे नावाचं गाव आहे. चिखर्डे गावात 3 महिन्यांपूर्वी एक उपोषण आंदोलन सुरु करण्यात आलं होतं. दिव्यांग निधीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं.3 महिन्यांपूर्वी दिव्यांग निधी मिळावा म्हणून चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आईवडिलांसोबत मुलगा आणि मुलगी उपोषणाला बसले होते. दरम्यान, 13 वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे या मुलीचा उपोषणादरम्यान, 3 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. 4 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या दाम्पत्याचा संभव रामचंद्र कुरुळे यांच्या मुलानेही प्राण सोडला आहे. 10 वर्षांचा दिव्यांग मुलगा संभव रामचंद्र कुरुळे हा देखील उपोषणाला बसला होता. या मुलाचाही मृत्यू झाल्यानं बार्शी येथे प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

*दिव्यांग निधीसाठी उपोषण-
चिकर्डे गावातील कुरुळे कुटुंब दिव्यांग निधीसाठी ऑगस्ट महिन्यात चिकर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. 3 महिन्यांआधी मुलगी गमावली आणि आता मुलाचाही जीव गेल्यानं कुरुळे पती-पत्नी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मुलीच्या मृत्यूनंतर कुरुळे दाम्पत्याला प्रशासनाकडून आश्वासनं मिळाली होती. पण काहीच न झाल्यानं दुसऱ्यांदा हे दाम्पत्य उपोषणाला बसलं होतं. पण यावेळी दिव्यांग मुलाचा या उपोषणादरम्यान मृत्यू झाल्यानं त्यांना मोठा धक्का बसला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment