पंढरपूर – आज पहाटे पंढरपूर तालुक्यातील करकम्ब परिसरात ऊस तोड कामगारांना घेवून जाणारा ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे . हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे . ऊस तोड मजूरांना ऊसाच्या फडात घेवून जात असताना ट्रॅक्टरला मोठा अपघात झाला. ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये तीन ऊसतोड मजूर महिलांसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर जवळच्या करकंब परिसरात घडली. घटने नंतर पोलिसांनी जखमी मजूरांना करकंब येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस पुढील तपास करीत असून अपघातात दोषी कोण यांचा शोध घेत आहेत.