कोल्हापुरात काही ना काही भन्नाट करणारी माणसं आहेत आणि त्यांची चर्चा ही नेहमीच होत असते कोल्हापूरकर कुणाच्याही मदतीला धावून जाण्यातही आघाडीवर आहेत. अशीच एक घटना कोल्हापुरात नुकतीच घडली आणि त्याची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे. कोल्हापूर शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे राहणाऱ्या ऋत्विक रायकर या तरुणाचा 70 हजार रुपये किमतीचा आयफोन पाण्यात पडताच त्याचे धाबे दणाणले होते पण कोल्हापुरातील उदय निंबाळकर या पट्टीच्या पोहणाऱ्या कोल्हापूरकराने ऋत्विक चा किमती आयफोन 14 तासानंतरच्या प्रयत्नांती काढून हातात सोपवला. यानंतर ऋत्त्विकच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच होता.
उदय निंबाळकर यांनी मोठ्या मेहनतीने ऋत्विकचा पाण्यात पडलेला फोन काढून दिला. विशेष म्हणजे 14 तास पाण्यात राहूनही ऋत्विक चा फोन सुस्थितीत असल्याने त्याला आनंद झाला .