पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरातील व्यावसायिकांना  सुवर्णसंधी

कोल्हापूर – टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने आज आपल्या प्रोजेक्ट ‘विस्तार’ची घोषणा आज कोल्हापूर येथे  केली.  भारतातील  कानाकोपऱ्यात  रंगीत  पत्र्यांची  सर्वोत्तम  उत्पादने  ग्राहकांना  उपलब्ध  करून  देणे  या  उद्देशाने  ही  संकल्पना  टाटा  ब्लूस्कोप  स्टीलकडून  राबविण्यात  येत  आहे.  सध्या  टाटा  ब्ल्यूस्कोप  स्टीलचे  संपूर्ण  भारतात  ६०००  पेक्षा  जास्त  वितरक  आहेत.  ही संख्या ९००० पर्यंत आणि महाराष्ट्रातील वितरकांची सख्या ५०० पर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत कंपनीचे डीलर मॅनेजमेंट, चॅनेल सेल, हेड  नंदकिशोर परमार यांनी दिली.

ते म्हणाले या  वितरकांद्वारे  ‘ड्यूराशाईन’  या  ब्रँड  नावाने  कलर  कोटेड  स्टीलची  छते  आणि  इतर  उत्पादने  उपलब्ध  आहेत.  प्रोजेक्ट  विस्तारमुळे  सामान्य,  होतकरू  व्यक्ती  माफक  भांडवलामध्ये  टाटा  ब्लूस्कोप स्टीलची डीलर होऊ शकते.
 
आज भारताची अर्थव्यवस्था खूप वेगाने वाढत आहे. ह्या वाढीचा दर २०२२ च्या आर्थिक वर्षात ७ टक्के अपेक्षित असून  भारताच्या जीडीपी वाढीमध्ये महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा वाटा आहे. भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील टियर २ आणि  ३ शहरांमध्ये मोठी बाजारपेठ आहे. राज्यातील ३५० हून अधिक तालुक्यांमध्ये मध्यम आणि लघुउद्योगांचा विकास अपेक्षित असून त्या बरोबरच पूरक गृहनिर्माण / रिअल इस्टेट  उद्योग, शाळा, कॉलेजेस, गोडाउन, मॉल्स, रिसॉर्ट्स, ह्याची भरभराट होऊ शकते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment