पश्चिम महाराष्ट्र

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने आता नवा वाद

पुणे – दादाजी कोंडदेव नंतर तुम्ही आत बाजी प्रभू देशपांडेचा कथित इतिहास दाखून वर्ण वर्चस्व वाद उकरून काढत आहे. असा मला संशय आहे, अस व्यकव्य करून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवीन वादाला तोंड फोडलं आहे. हर हर महादेव या चित्रपटातल्या वादाच्या सीन्सवर लक्ष करून, आव्हाडांनी नवीन संशय व्यक्त केला आहे.

बाजी प्रभू देशपांडेंच्या इतिहासावर आधारित हर हर महादेव चित्रपट वादाच्या भवर्यात सापडला होता. चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले काही सीन्स आणि डायलॉग, इतिहासाचा मोडतोड करून प्रेक्षकांना दाखवण्यात आल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक होऊन अनेक शो बंद पाडले होते. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटावर बोट दाखवत नवीन संशय व्यक्त केला आहे. पुण्यात काँग्रेस तर्फे आयोजित केलेल्या सेवा त्याग सप्ताहच्या उद्घाटन प्रसंगी जितेंद्र आव्हाड बोलत होते. आव्हाड म्हणाले..

काय तो हर हर महादेव हा चित्रपट निव्वळ विकृती पणा आहे. जे बाजी प्रभू देशपांडे महाराजांच्या हृदयाच्या जवळचे होते. त्यांच्या तोंडामध्ये शब्द घातला जातो ” मला मारायच्य शिवाजी शहाजी भोसलेला ” हा नेमका कोणता इतिहास, त्याच्यातुन वर्ण, वर्चस्व वादाचा वास येतो. पुण्यातूनच तुम्ही पाहिले दादोजी कोंडदेव चे पाय कापलेत त्यानंतर ते इतिहासात बाजूला गेले. ज्यांनी कथित तयार केलं होतं तेच फेकल गेलं बाहेर. आता नवीन कथित तयार करायचंय आणि ते बाजी प्रभू देशपांडेंच्या नावाने तयार कार्याच्या असा मला संशय आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणले..

दादाजी कोंडदेव यांच्या बाबत कसा पेटला होता वाद ;

13 फेब्रुवारी 2003 मध्ये अमेरिकेच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये, अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन लिखित ” शिवाजी ; हिंदू किंग इन इस्लामीक इंडिया ” हे पुस्तक प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ आणि दादाजी कोंडदेव यांच्या बाबत बदनामी करणारा मचकूर गाव गप्पा म्हणून लिहिण्यात आला होता. यानंतर अमेरिकेच्या या पुस्तकाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. या पुस्तकाचा लेखनासाठी आणि गाव गप्पा पुरवण्यासाठी पुण्यातल्या इतिहास संशोधकांनी मदत केल्या असल्याचा आरोप त्या वेळेस संभाजी ब्रिगेड यांनी केला होता. मात्र गेल्या 7 महिन्या पूर्वी ठाण्यात झालेल्या मनसेच्या सभे मध्ये राज ठाकरे यांनी तो वाद पुन्हा उखरून काढला. आणि आज पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी शंका उपस्थित करून नवीन वादाला तोंड फोडलं आव्हाड म्हणले..

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment