चोपडा – पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर शहरातील चोपडा यावल रोडवरील कारगिल चौकातील भाऊ हॉटेल समोर अजित गुजर बारेला (३७)(रा. रंगराव आबानगर मल्हारपुरा चोपडा) याला एक गावठी बनावट पिस्तूल व मॅक्झिनसह पोलिसांनी रंगेहात पकडल्याची घटना दि २ रोजी दुपारी घडली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुफ्त माहितीच्या आधारे अजित गुजर बारेला हा त्याच्या कमरेला गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार जळगाव स्थानिकगुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचत शहरातील भाऊ हॉटेल समोर अजित बारेला आहे याला अटक करून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा पिस्तूल व एक मॅक्झिन व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.
या घटनेत अजित बारेला कडून तीस हजार किमतीच्या एक गावठी कट्टा व एक हजार रुपये किमतीच्या एक जिवंत काडतुस असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, सदर कारवाई ही जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून आरोपीस चोपडा शहर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.