खान्देश

नंदुरबार जिल्ह्यात लाॅकअप तोडून आरोपी फरार

नंदुरबार – नवापूर पोलीस ठाण्यातील लाॅकअपची लाकडी खिडकी तोडून पाच आरोपी पाच डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फरार झाले होते. त्यातील एक आरोपी गुजरात एलसीबीने पाच डिसेंबर रोजी पकडला तर दुसरा आरोपी नंदुरबार एलसीबीने मध्य प्रदेश मधून आठ डिसेंबर रोजी पकडला होता. तीन आरोपी मोकाटच होते. पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी आरोपींचा शोधात पथक रवाना केली होती,२३ दिवसानंतर नंदुरबार पोलिसांनी चंदन तस्कर व दरोडेखोर कुख्यात आरोपींना जेरबंद केले आहे. या आरोपींनी नंदुरबार पोलिसांची चांगलीच दमछाक केली होती. यांच्या अटकेने राज्यभरातील मोठे गुन्हे उघडे येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नवापूर तालुक्यातील कोठडा शिवारात कुख्यात पाच दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एका स्कार्पिओ गाडीत धारदार शस्त्राने येत असल्याची गुप्त महिती नवापूर पोलिसांनी मिळाली होती. ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास नवरंग रेल्वे गेट जवळ त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून नवापूर पोलिस ठाण्यात जेरबंद करण्यात आले होते. सकाळी पुरुष लॉकअपाच्या शौचालयाची लाकडी खिडकी त्यांनी ९ वाजून ५ मिनिटाला तोडून फरार झाले. एक आरोपी गुजरात पोलिसांनी जेरबंद केला तर चार आरोपी नंदुरबार पोलिसांनी जेरबंद केले आहे.

फरार आरोपींची नावे
१) हैदर उर्फ इस्त्राईल ईस्माईल पठाण वय २० रा कुंजखेडा जिल्हा औरंगाबाद याला गुजरात सीमावर्ती भागातील माणिकपूर येथील बस स्थानकावर निघण्याच्या तयारीत असताना पाच डिसेंबर रोजी गुजरात गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली होती. दुसरा आरोपी नंदुरबार गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आठ डिसेंबर रोजी मध्यप्रदेश राज्यातील जंगलातून २) अखिलखाॅ ईस्माईलखॉ पठाण वय २४ रा कोठार जिल्हा जालना या आरोपीला अटक केली.

३)इरफान इब्राहिम पठाण वय ३५ , ४) युसूफ असिफ पठाण वय २२, ५)गौसखो हानिफखाॅ पठाण वय ३४ रा तिन्ही राहणार ब्राह्मणी गराडा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद हे तीन आरोपींना २३ दिवसानंतर त्यांचा गावाकडून नंदुरबार पोलीसांनी जेरबंद केले आहे. आरोपीच्या शोधात नवापूर पोलीस व नंदुरबार पोलिसांनी मोठे परिश्रम घेतले. या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यातील कर्तव्यात कसूर केलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. उशिरा का होईना पोलीस अधीक्षकांची व्यूहरचना कामी आली. असे प्रकार नंदुरबार जिल्ह्यात होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment