कोंकण महाराष्ट्र

उल्हासनगरात अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाई

उल्हासनगर – उल्हासनगरात सार्वजनिक ठिकाणी बॅनर आणि होर्डिंग्ज लावून शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. या बॅनरबाजांवर महापालिकेनं गेल्या १० दिवसात तब्बल २० गुन्हे दाखल केले आहेत.

उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक जागेत, रस्त्यावर किंवा पथदिव्यांच्या खांबांवर अनधिकृतपणे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनरबाजांच्या विरोधात महापालिकेनं मागील १० दिवसात तब्बल २० गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्यास अधिनियमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या बॅनर्समध्ये बहुतांशी राजकीय बॅनर असल्यानं त्यांच्यावर यापुढे एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. तसे गुन्हे दाखल झाल्यास संबंधित राजकारणी हे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरतात. त्यामुळं या गुन्ह्याच्या धाकाने तरी अनधिकृत बॅनरबाजी कमी होते का? हे पाहावं लागणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment