पश्चिम महाराष्ट्र

बारामतीत दहशत पसरवणाऱ्या गॅंगवर मोक्कांतर्गत कारवाई..

बारामती… बारामती शहरात कसबा येथे हॉटेलची तोडफोड करत हॉटेल चालकाला जखमी करणाऱ्या गॅंगवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आदेश संजय कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर, ऋषिकेश चंदनशिवे, तेजस बच्छाव,यश जाधव अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

दिनांक ११ नोव्हेंबर रोजी भर दुपारी वरील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी फलटण चौक येथील हॉटेल दुर्वाज मध्ये जाऊन हॉटेल चालकावर व कामगारावर दहशत बसवण्यासाठी व त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड केली व हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला १३ टाके पडले होते.त्यानंतर या सर्व आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, घराविषयी आगळीक व दंगल या भादवी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. (३०७,३८४,४२७,१४३,१४७,१४९ सह अर्म act ४ २५) गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते येरवडा कारागृहात आहेत.

सदर गँगने बारामतीत यापूर्वीसुद्धा दहशत पसरवण्यासाठी गुन्हे केले आहेत. प्रचलित कायद्याचा धाक त्यांना राहिला नव्हता त्यामुळे या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना पाठवला. या गुन्हेगारांची पार्श्वभूमी बघता मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना विशेष सहाय्य केले. या गुन्ह्याला मोक्का कायद्यांतर्गत कलमांचा समावेश करून या गुन्हेगारांना मोक्का कोर्टातून कडून ताब्यात घेऊन याचा पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहेत.

याही पुढे सर्व गुन्हेगारांच्या कुंडली तयार असून या प्रकारे दहशतीचे गुन्हे करणाऱ्यांवर मोक्का एम्पीडीअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली..

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment