महाराष्ट्र मुंबई

गोखले पुल मूल्यांकनासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करावी – आदित्य ठाकरे

मुंबई – मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक म्हणून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या पुलासंदर्भातील दोन अहवाल बृहन्मुंबई महानगरपालिकेला दोन अहवाल प्राप्त झाले आहेत. यासंदर्भात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मत व्यक्त केलं आहे. गोखले पुलावरून दुचाकी-तीनचाकी वाहनांच्या परवानगीसंदर्भात पालिकेने समिती स्थापन करावी, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. गोखले पुलासंदर्भात दोन तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्याचं मी ऐकलं आहे. हे दोन्ही अहवाल परस्परविरोधी असल्याने मूल्यांकनासाठी तज्ञ आणि सल्लागारांची उच्चाधिकार समिती स्थापन करावी, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

गोखले पूल दररोज लाखो मुंबईकरांना जोडतो, आता अचानक बंद पडल्याने त्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, मला सांगण्यात आले आहे की दोन्ही अहवालांनी असं सुचवलं आहे की दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना वेगवेगळ्या प्रमाणात दुरुस्ती आणि निर्बंधांसह प्रवास करण्याची परवानगी द्यावी. पालिकेने हे दोन्ही अहवाल सर्वांना उपलब्ध करून द्यावेत. हा अभ्यासाचा आणि व्यापक जनहिताचा विषय आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दोन परस्परविरोधी अभ्यास असल्याने, तज्ज्ञ आणि सल्लागारांची तिसरी उच्च प्राधिकरण समिती दुरूस्तीच्या मर्यादेसाठी आणि पुलावर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना चालवण्यास परवानगी दिली जाऊ शकते की नाही याच्या कालबद्ध मूल्यांकनासाठी स्थापन करण्यात यावी; यात पारदर्शकता असावी, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment