क्रीडा

एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ : जपानचा व्हिएतनामवर विजय;

उपांत्यपूर्व फेरीत दाखल

पुणे, ता. २४ : गतविजेत्या जपानने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज झालेल्या सी गटातील दुसऱ्या एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ सहा गुण झाले. यामुळे जपान आणि कोरिया संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

कोरियाने या आधी झालेल्या सामन्यात म्यानमारचा २-० गोलने पराभव केला. गटातील दोन अव्वल संघ या नात्याने त्यांनी आपली आगेकूच कायम राखली.


दोन पूर्व आशियाई प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेला हा सामना गटविजेता निश्चित करणारा होता. आता सर्वोत्तम तीन संघातून बाद फेरी गाठण्यासाठी व्हिएतनामला अखेरच्या साखळी सामन्यात म्यानमारला चांगल्या फरकाने हरवावे लागेल.


जपानने यापूर्वी २०१४ आणि २०१८ मध्ये या स्पधेर्चे विजेतेपद मिळविले आहे. त्यांची आजची सुरवात त्यांच्या लौकिकाला साजेशी अशीच होती. पहिल्या सामन्यात त्यांनी म्यानमारचा ५-० गोलने पराभव केला होता.

सहाजिकच या विजयाने त्यांचा आत्मविश्वास अधिक उंचावला होता. मुख्य प्रशिक्षक फुतोशी इकेडा यांनी त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये केवळ कर्णधार साकी कुमागई, रिसा शिमिझु आणि मिना तनाका या तिघींनाच कायम ठेवले.

या व्यतिरक्त पूर्ण नवा संघ खेळवूनही त्यांचे सामन्यावरील वर्चस्व कुठेही कमी झालेले नव्हते.
सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला त्यांना गोल करण्याची संधी निर्माण झाली होती. युई नारुमिया हिला रुका नोरीमात्सु हिच्याकडून सुरेख पास मिळाला होता. पण, ती लक्ष्य साधू शकली नाही.

नादेशिको हिच्या सततच्या आक्रमणाने व्हिएतनामची बचावफळी त्रस्त झाली होती. पण, सामन्याच्या ३८व्या मिनिटाला व्हिएतनामची गोलरक्षक त्रान थी किम हिने हना ताकाहाशी हिचा प्रयत्न हाणून पाडला. पण, नारुमियाने नंतर अगदी जवळून जाळीचा भेद घेत जपानला आघाडीवर नेले.


उत्तराधार्नंतर पाचच मिनिटांनी कुमागई हिने दुसरा गोल केला. तिचा हा गोल म्हणजे सर्वात वेगवान कृती होती. तनाकाचा हेडर मैदानात रिबाऊंड होऊन परत आल्यावर काही कळायच्या आत कुमागई हिने गोल केला. कुमागई हिच्या विलक्षण कामगिरीनंतर आठच मिनिटांनी नादेशिको हिने जपानचा तिसरा गोल केला. नादेशिको हिने कॉर्नर किकवर गोलकक्षाच्या मध्यातून सुरेख हेडरकरून हा गोल केला.


व्हिएतनामने अखेरच्या २० मिनिटांत कमालीचा खेळ केला. फाम हई येन हिने ७५व्या मिनिटाला गोल करण्याचा सुरेख प्रयत्न केला. पण, जपानची गोलरक्षक मोमोको तनाका हिने तेवढ्याच सफाईने तिचा प्रयत्न परतवून लावला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment