पश्चिम महाराष्ट्र

वर्षा अखेरीला साताऱ्यातील पर्यटन फुलले

सातारा – जिल्हा हा निसर्गरम्य म्हणून ओळखला जातो. दुष्काळी माणखटाव तालुक्यापासून ते महाप्रचंड पावसाच्या जावळी खोऱ्यापर्यंत विविधता याच जिल्ह्यात पहावयास मिळते. साताऱ्यातील सर्वात फेमस पर्यटन ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. मात्र महाबळेश्वर सोडून देखील साताऱ्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना आपण भेट देऊ शकतो.

भांबवली वझराई धबधबा भांबवली वझराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याची उंची १८४० फूट (५६०मीटर) आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि याला तीन पायऱ्या आहेत. उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला आहे. प्रसिद्ध कास पुष्प पठारापासून ५ किमी दूर आणि पुष्प पठारापासून २ किमी दूर आहे.

तापोळा (बोट क्लब) महाबळेश्वर पासून ३० कि.मी.अंतरावर सहलीसाठी आणि बोटिंग करण्यासाठी सुंदर तापोळा तलाव आहे. हा तलाव कोयना धरणातील शिवसागर या विशाल जलाशयाचाच शेवटचा भाग आहे. भांबवली पुष्प पठार हे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. हे सातारा शहरापासून अंदाजे ३० किमी दूर स्थित आहे. हे पठार उंच डोंगराळ आणि गवताळ प्रदेशात वसलेले आहे. पाऊस, विशेषकरून ऑगस्ट ते ऑक्टोबर पर्यंत याला एक पुष्प पठार बनवतो. भांबवली पठारवर १५०पेक्षा अधिक प्रकारचे फुले, झुडुपे आणि गवत आहेत. पठार मोठ्या प्रमाणावर बेसाल्ट दगडाच बनलेली आहे. बेस्टॉल्ट खडक हा जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर एक इंच पेक्षा जास्त असतो.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment