कोल्हापूर – भारत इतिहास अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी क्रिएशन ऑफ डिजिटल लायब्ररी फॉर व्हर्टकल सोर्सेस ऑफ इंडियन हिस्ट्री स्टडी ऑफ कल्चर डिजिटलायझेशन हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत एकंदरीत ज्या काही खाजगी संस्था पूर्ण भारतभर आहे त्यांनी ज्यांच्याकडे पांडू लिपी मध्ये आणि भारतीय भाषांमध्ये प्राचीन भारतीय भाषा किंवा मध्ययुगीन भारतीय भाषा त्याच्यामध्ये उपलब्ध असणारी सर्व काही साधने आहेत ती सर्व साधने एकत्रित करून ती डिजितलायझेशन करून आयसीएच्या प्लॅटफॉर्म वरती सर्व लोकांसाठी सर्व संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे अशी माहिती आज भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्य सचिव डॉ. उमेश अशोक कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्य सचिव डॉ. उमेश अशोक कदम यांच्या पुढाकाराने सोमवार दिनांक २ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी अकरा वाजता परिषदेच्या वतीने त्यांचा आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासमवेत इतिहासासंदर्भात महत्वाच्या देवाण-घेवाणविषयीचा करार आज झाला. यात प्रामुख्याने मराठा इतिहासाच्या विश्वकोशाची निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राहणार आहे. छत्रपती शाहू महाराज सेंटर फॉर स्टडीजच्या सामग्री व हस्तलिखिते यांच्यावरील अभ्यासासाठी देवाणघेवाण, त्यांचे डिजिटलायझेशन, स्थानिक भाषेवर आधारित मराठा इतिहासावरील १० मोनोग्राफ प्रकाशित करणे, संशोधन पद्धती तसेच स्त्रोत यांच्यावरील कार्यशाळेचे आयोजन, मराठा इतिहासावरील स्थानिक परिसंवाद, मोठ्या संशोधन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देणे, ई-लर्निंग कंटेंट डेव्हलपमेंटमध्ये सहभागी करणे तसेच ऑनलाइन व्याख्यानांची मालिका, मराठी भाषा आणि मोडी लिपी ऐतिहासिक अर्थाने समजून घेणे आदी उपक्रम या अंतर्गत होणार आहेत.
या उपक्रमांतर्गत एकंदरीत मराठा सेंटर जे आहे शिवाजी विद्यापीठाचे त्यांच्याकडे जवळजवळ पाच लाखापेक्षाही जास्त मोडी लिपीमधील कागदपत्र उपलब्ध आहेत आणि त्या कागदपत्र गेली बारा वर्षे डिजिटलाईट झाली नाही आहेत आणि जी काही डिजिटेज झाली नाहीत त्यांना डिजिटलाईज करणे आहेत. आणि त्यांना एक मूळ क्लाऊड प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे ज्याअर्थी पूर्ण जगामध्ये जिथे जिथे मराठा इतिहासाशी संदर्भात संशोधक उपलब्ध आहेत. त्यांना ती उपलब्ध करून द्यायचे आणि स्थानिक साधनांच्या आधारे राष्ट्रीय इतिहास लेखन प्रक्रिया करायची हा एक दृष्टिकोन आहे. दुसरा दृष्टीकोन हा आहे की जे काही मराठा हिस्ट्रीला आजपर्यंत रिजनल हिस्ट्री स्थानिक इतिहास आणि सक्सेशर स्टेटस अशी जी काही नावे देण्यात आलेली आहेत. आणि जी मार्कशीस दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास झालेला आहे. तो एकंदरीत बाजूला करून स्थानिक पातळीवरील ह्याचा अभ्यास करून मराठा हिस्ट्री ही सतराव्याने अठरा व्या शतकातील भारताचा इतिहास मूळ राष्ट्रीय इतिहास कसा होता हे प्रस्थापित करण्यासाठी एकंदरीत या सर्व स्थानिक साधनांचा उपयोग करून घेण्यात येणार आहे.
या एमओयु म्हणजेच सामंजस्य करा अंतर्गत शिवाजी विद्यापीठाला आम्ही बरेच काही वर्कशॉप सेमिनार्स,प्रोजेक्स उपलब्ध करून देत आहोत. याच्या अतिरिक्त जे भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेने पाच मोठे प्रोजेक्ट हाताशी घेतले आहेत ज्याला कंपरियांसी हिस्ट्री ऑफ इंडिया भारताचा समुद्र इतिहास लेखन, भारताचा आर्थिक इतिहास लेखन,सायन्स अँड टेक्नॉलॉजी इसरो बरोबर सुरू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एकंदरीत शिवाजी विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागातील संशोधकांनी त्याच्यामध्ये आपले योगदान द्यावं आणि त्याच्याशी त्यांनी स्वतःला एकंदरीत सहकार्य करावे ज्याच्यासाठी सुद्धा आज शिवाजी विद्यापीठाचे प्रोफेसर कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी याच्यामध्ये रुची दाखवलेली आहे आणि त्यांनी या सर्व गोष्टींना पुढे नेण्याची एकंदरीत आम्हाला हमी दिलेली आहे. आणि याच्या अंतर्गत एकंदरीत आम्ही हा करार आज केलेला आहे. असे उमेश कदम यांनी सांगितले.
शिवाय अशाच प्रकारचा करार यापुढे ७ जानेवारी २०२३ रोजी धारवाड (कर्नाटक) येथील बहु-अनुशासनात्मक विकास संशोधन केंद्रासमवेत होणार आहे. डॉ. उमेश अशोक कदम यांचा केंद्राचे सदस्य सचिव वेदव्यास हुगुंड यांच्यासमवेत हा करार होईल. या करारानुसार स्थानिक इतिहास संशोधन विषयक प्रभावीपणे कार्य करण्यात येईल. तसेच इतिहासाची नवी दालने अभ्यासक तसेच जनतेसाठी खुली करण्याचा हा एक प्रयत्न असेल, असे डॉ. उमेश अशोक कदम यांनी याबाबत बोलताना सांगितले आहे. यावेळी मानव्य शास्त्र शाखा अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे,डॉ. दत्तात्रय मचाले आदी उपस्थित होते.यावेळी आभार डॉ. निलांबरी जगताप यांनी मानले.