कोंकण महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहीजेत – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

रत्नागिरी – शेतकरी बांधवांचा सन्मान करण्याचा आदेश आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे या सरकारकडून शेतकऱ्यांची कोणतेही नुकसान केले जाणार नाही शेतकऱ्यांचा सन्मान करण्यास हे सरकार कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दापोली येथे बोलताना गेली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या संयुक्त संशोधन परिषद व कृषी प्रदर्शनाचे दापोली येथे उद्घाटन करताना ते बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ संशोधकांनी काम करणे आवश्यक आहे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय सावंत, संशोधन संचालक डॉ.संजय भावे चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. अवकाळी पडलेल्या पावसाची ही नुकसान पाहणी करून ती भरपाई देण्यात येईल पीक विमा योजनेबाबतही शेतकऱ्यांचा नुकसान केले जाणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान या सरकारकडुन केले जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यासाठी आपली सगळ्यांचे काम महत्वाचे आहे. राज्यातील कृषी संशोधक प्राध्यापक जे उत्तम काम करत आहेत त्यांच कामाचे मूल्यमापन करून त्यांचाही कामाचा गौरव केला जाईल हा उपक्रम आपण सुरू करत आहोत. अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
                                                                           
ते पुढे म्हणाले की, मीही सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील आहे पण माझ्या आयुष्यातला शेतकऱ्यांचा सन्मान करणार पहिलं सरकार हे मी बघितला आहे. या सरकारने शेतकऱ्यांचे उत्तम सन्मान केला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या सगळ्या योजनांना मान्यता देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. कोकणातील काजू आणि आंब्याला 200 कोटी रुपयांचा विशेष पॅकेज देण्यासाठी मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे गोव्याच्या धर्तीवरती कोकणातील आंबा काजू बागायताना अनुदान देण्याची योजना आणण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात आयोजित प्रदर्शनात आपण अडीच तासात राज्यातील चारही कृषी विद्यापीठानी केलेले संशोधन त्यांनी केलेले काम आपण पाहिले असे सांगत उत्तम काम करत असलेल्या कृषी प्राध्यापक संशोधकांच त्यांनी कौतुक केले. आज पासून सुरु झालेल्या या राज्यातील चारही कृषी विद्यापीठ संयुक्त संशोधन परिषदेत शिफारस करण्यात आलेले संशोधन नवीन शोधून काढलेल्या जाती नवीन वाण या संशोधनावर यावर अंतीम शिक्कामोर्तब १६ डिसेंबर रोजी करण्यात येईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. 

माझा कृषी मंत्री पदाचा कार्यकाळात दोन वर्ष आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत यासाठी काम केलं. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व्यापारीकरण शिकवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी आवश्यक उपाययोजनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त उपयोजना केल्या जातील यासाठी मी जरी कृषी खात्याचा प्रमुख असलो तरी तुम्ही कृषी संशोधक करत असलेले काम महत्वाचे आहे. असे मत यावेळी कृषीमंत्र्यांनी व्यक्त केले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment