सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे एक अनोख कार्यक्रम पाहायला मिळाला.१०६ वर्षाच्या आजीबाईना कुटुंबीयांनी पाळण्यात घालून त्यांचं नामकरण केलं. निमित्त होतं आजीबाईना १०६ व्या वर्षी दुधाचे दात परत आले.१०६ व्या वर्षी दुधाचे दात परत आल्याने घरातील महिलांनी पाळणा सजवून आजीबाईना त्या पाळण्यात बसवून बार्स केलं.१०६ वर्षाच्या धानव्वा उडगे यांना दुधाचे दात परत आल्याने चपळगाव येथे कौतुकाचा विषय झाला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे धानव्वा उडगे यांना १०६ व्या वर्षी दुधाचे दात परत आल्याने गावातील महिलांनी व कुटुंबातील महिलांनी पाळणा सजविला. आजीबाई धानव्वा यांना बाळा सारखी टोपी घालून ,त्या पाळण्यात बसविले ,एका लहान बाळाचं ज्याप्रमाणे नामकरण म्हणजे बार्स केलं जातं त्याप्रमाणे आजीबाईच नामकरण केलं.