राजकारण

मंत्रीमंडळ विस्तारावरून अजित पवारांची पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर अनेकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होते आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मंत्रीमंडळ विस्तारावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. डागाळलेल्या आमदारांना मंत्री बनवणे अत्यंच चुकीचं असल्याचे ते म्हणाले. तसेच मंत्रीमंडळात एकाही महिलेला स्थान न देण्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. सर्वात जास्त महिला आमदार भाजपाच्या आहेत. असं असताना एकाही महिलेला मंत्रीमंडळात स्थान न देणं हे समस्त महिला वर्गाचा अवमान असल्याचं ते म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?
“महिन्याभरापासून रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार अखेर काल पार पडला. मात्र, मंत्रीमंडळाची यादी जर आपण बघितली, तर ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत. त्यांना स्थान देण्यात आले आहे. ज्यांना कोणतीही क्लिनचीट मिळालेली नाही, अशा आमदारांनाही त्यांनी मंत्रीमंडळात घेतले आहे. हे फार चुकीचे पाऊल शिंदे-फडणवीस सरकारने उचलले आहे, हे सर्व महाराष्ट्र बघतो आहे”, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. “विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी याच आमदारांवर प्रचंड आरोप केले होते. मात्र, आता त्यांनाच मंत्रीमंडळात घेतले आहे”, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.

“हा महिला वर्गाचा अवमान”
“आपण नेहमीच महिलांना सन्मान देत असतो. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी दिली पाहिजे असं समजतो. आज विधानसभेत ज्या महिला आमदार आहेत. त्यापैकी सर्वात जास्त महिला आमदार भाजपाच्या आहेत. असं असताना एकाही महिलेला मंत्रीमंडळात स्थान न मिळणं हे दुर्दैवी आहे. हा सरळ सरळ महिला वर्गाचा अवमान आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment