बारामती – विरोधी पक्ष नेते अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत, त्यांनी कार्यक्रम दरम्यान महिलांचे कान टोचले आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, आता इथे तुम्ही सर्व महिला आहेत, तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला आवडो अगर ना आवडो, आपली सूनबाई आली तर तिला म्हणाव एक मुलगा आणि एक मुलगी एवढ्यावरच थांब, कसला वंशाचा दिवा अन् कसला काय, पवार साहेबांनी देखील फक्त सुप्रिया सुळे एवढ्यावरच थांबले, असे उदाहरण देखील अजित पवार यांनी नागरिकांना दिले. वंशाच्या दिव्यासाठी देवाची कृपा, देवाची कृपा, अरे कुणाची कृपा माहीत नाही का आम्हाला, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, त्यामुळे गमतीचा विषय सोडून द्या पण खोरखरच ही महत्त्वाची गोष्ट असल्याचे अजित पवार म्हणालेत.