अमरावती :- संपूर्ण जिल्हाभर २५२ सरपंच पदाकरिता निवडणुका येत्या १८ डिसेंबर रोजी होणार आहेत. ग्रामीण भागात गेल्या काही दिवसपासून प्रचारतोफांचा आवाज दिनांक १६ डिसेंबर पासून अखेर शांत झालेला दिसून येत आहे. थेट सरपंचपदाची निवडकुन असल्यामुळे ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात या निवडणुकीकडे आशेने पाहत असून आपले भवितव्य आजमावत आहेत . राजकारणातील मोठे नेते तर आपला राजकीय वारसा पुढे चालू ठेवण्या करिता वारसदारांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून ते मोठया प्रमाणात प्रचार करण्यात गुंतलेले दिसून आले. याच बरोबर एकंदरीत काय तर सरपंच आपलाच असला पाहिजे एवढेच या प्रचार तोफा दिनांक १६ डिसेंबर पासून थांबल्या असून, आता निवडणुका आणि सरपंच याकरिता सर्वांचे लक्ष लागले आहे.