कोंकण महाराष्ट्र

अक्षय फाटक यांची दापोली विधानसभेच्या राजकारणाती एंट्री, शिंदे गटाचे दोन उमेदवार पराभूत भाजप शहर संघटकाच्या राजीनाम्याने खळबळ

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गट आघाडीवर राहिला पण दापोली विधानसभा क्षेत्रात आमदार योगेश कदम यांचेच वर्चस्व राहिले आहे. पण या निवडणुकीत सगळ्यात मोठी असलेल्या जालगाव ग्रामपंचायतीत अपक्ष उमेदवाराचा झालेला विजय अवघ्या जिल्हयात चर्चेत राहिला आहे. एकनाथ शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार, भाजपाचाही एका मोठया युवा नेता यांचा मोठा पराभव करून अपक्ष असलेले उद्योगपती अक्षय फाटक हे  सरपंच म्हणून निवडून आले. ‘सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मिळालेले असमान्य यश’ असा बॅनर दापोलीत लागले आहेत ते सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आता दापोलीच्या राजकीय पटलावर अक्षय फाटक यांची झालेली एंट्री अनेकांची धाकधुक वाढवणारि ठरली आहे. अपक्ष उमेदवार अक्षय फाटक यांना निवडणुकीत मदत केल्याने एका युवानेत्याकडून झालेल्या मारहाणीनंतर भाजप शहर संघटक पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. आता अपक्ष असलेले असलेले सरपंच अक्षय फाटक पुढील काळात कोणती भूमिका घेतात याकडेही अनेकांच लक्ष लागल आहे.

जलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत झालेला  भाजपाच्या एका मोठ्या युवानेत्याच्या पराभव जिव्हारी लागला आहे. २० डिसेंबर रोजी ज्या दिवशी ग्रापंचायत निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी झाले दापोलीत एका नामांकित सोन्याच्या पेढीसमोर अक्षय फाटक यांची मिरवणूक आल्यावरती ही दोन भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाल्याची चर्चा दापोलीत रंगली आहे मात्र दोघेही एकाच पक्षाचे पदाधिकारी असल्याने हा विषय सामोपचाराने मिटवण्यात आला आहे.

मात्र यात आता या पराभावाची दखल भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे. रत्नागिरी जिल्हयाच्या बांधकाम क्षेत्रातील एक मोठे नाव असलेले उद्योजक अक्षय फाटक यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत केलेली एंट्री येथील भाजपच्या प्रस्थापित नेत्यांसाठी धाकधूक वाढविणारी ठरली आहे. अक्षय फाटक हेही मुळचे भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ संबंधित असलेल्या कुटूंबातील आहेत पण त्याना ग्रामपंचायत निवडणूकित पक्षाकडुन उमेदवारी नाकारण्यात आली व भाजपकडुन केंद्रीय आयोगाच्या अध्यक्षपदी राहिलेले ज्येष्ठ नेते दादा ईदाते यांचे चिरंजीव श्रीराम उर्फ भाऊ ईदाते यांना ही उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे मनोज भांबिड, शिवसेनेचे विलास जालगावकर हे सगळे राजकारणात अनुभव असलेले उमेदवार सरपंचपदासाठी उभे राहीले होते. त्या तुलनेत उद्योगपती अक्षय फाटक हे सक्रीय राजकारणात नवखे होते पण त्यांची युवा कार्यकर्त्यांमध्ये असलेली क्रेझ उद्योग क्षेत्रात अल्पावधीतच फाटक डेव्हलपर्स नावाचा लोकप्रिय ठरलेला ब्रॅण्ड यामुळे अक्षय फाटक यांचा हा दणदणीत विजय राजकिय समीकरण बदलवणारा ठरण्याची शक्यता आहे.

आता दापोलीच्या राजकीय पटलावर एंट्री झालेल्या अक्षय फाटक यांची या निवडणुकीपूर्वी  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही थेट भेट घेतली होती तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही अक्षय फाटक यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मदतीकरता घेतलेली थेट भेट यामुळेच आता अपक्ष म्हणून सरपंचपदी निवडून आलेल्या अक्षय फाटक यांनी राजकरणात केलेली दमदार एंट्री भाजपमधील काही प्रस्थापितांसाठीही धक्कादायक ठरण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जालगांव ग्रामपंचायत निवडणूकित आपल्या पक्षाचे सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाले. या निवडणूक प्रचाराबाबत माझी असलेली भूमिका ही तालुका अध्यक्ष या नात्याने आपल्याशी स्पष्ट केली होती. तरीही उमेदवारांनी त्याच्या परभवाचे खापर गैर पध्दतीने माझ्यावर फोडले. मी आपल्या पक्षाचा दापोली शहराचा एक जबाबदार पदाधिकारी आहे. त्यामुळे या पराभवाची नैतिक जवाबदारी स्विकारून मी माझ्या पदाचा राजीनामा आपल्याकडे देत आहे. तो आपण स्विकारून मला पदमुक्त करावे. पुढील काळात मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहिन असे तांबे यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.त्यामुळे आता येत्या काळात भाजपचे जिल्हा पातळीवर नेते हा सगळा वाद कशाप्रकारे हाताळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment