अमरावती – पुण्या मुंबई प्रमाणे अमरावती जिल्ह्यातही सध्या लिव्ह इन रिलेशनशिप मधील वादाचा वाटेवर येऊ लागले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू्त लैंगिक शोषण करून आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून त्या तरुणीचे अपहरण केले आणि तिला पत्नीसारखे वागवून लैंगिक शोषण करण्यात आले. सदर घटना शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितनुसार, बादल ज्ञानेश्वर मनोहर (२५) असे आरोपीचे नाव असून पीडिता २२ वर्षीय तरुणीची मार्च २०१६ मध्ये बादलसोबत ओळख झाली.ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर बादलने पीडित तरुणीला लग्नासाठी प्रस्ताव दिला. दोघांमध्ये मोबाइल संवाद वाढला. सोशल मीडियावर ते व्यक्त होऊ याचंच फायदा घेत बादलने पीडिताला भेटायला बोलावून जबरीने मामाच्या घरी नेले. आपले लग्न झाल्याचे समज असे म्हणून बादलने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या काळात तब्बल तीन वर्षे बादलने पीडित तरुणीला पत्नीसारखी वागणूक देत संधी साधली. ते रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंतर बादलने आजी मरण पावल्याचे सांगून तरुणीला अमरावतीला आणले. तेथे दोघांनी भाड्याची खोली केली. पुण्याहून साहित्य घेऊन येतो, असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर त्याने तरुणीसोबत बोलणे व भेटण्यास टाळाटाळ सुरू केली. तेव्हापासून बादल हा आठ किंवा पंधरा दिवसांतून एकदा पीडित तरुणीच्या घरी जाऊन तिचे लैंगिक शोषण करू लागला.
तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बादलविरुद्ध विश्वासघात अपहरण व बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक सोनाली मेश्राम या करीत आहेत.’