पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा सरपंच झाल्याशिवाय…,अमरजित पवार यांचा प्रण पूर्ण

पंढरपूर – तालुक्यातील आजोती ग्रामपंचायत सरपंच पदासह सर्व गट राष्ट्रवादीचा निवडून येण्यासाठी अमरजीत पवार हे आग्रही होते. त्यानुसार आरती अभिजित पवार हे विजयी झाले. या विजयानंतर अमरजित पवार यांच्या केसाची व दाढीची चर्चा रंगली. गेल्या तीन वर्षापासून सरपंच पद राष्ट्रवादीचा झाल्याशिवाय आपण केस आणि दाढी काढणार नाही. असा पण, पवार यांचा होता. आणि आज पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनतेमधून सरपंच झाल्यावर त्यांनी हा आपला पण, तिरुपती बालाजी येथे जाऊन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानत पुष्पा स्टाईलने आपल्या केसावरून आणि दाढीवरून हात फिरवत मतदारांना अभिवादन करत आभार मानले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment