अमरावती – दिवसभर गावसुधारणा करून गावातील धूळ साफ करणे, आणि रात्रिच्या वेळेस भजन कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील धूळ साफ करणे अशी दैनंदिन दिनचर्या बाबांनी आपल्या जीवनात अंगीकार केला. तोच अंगीकार जनतेने आपल्या आयुष्यात करावा अशी बाबांची शिकवण होती, बाबांनी आयुष्यात १० कलमी संदेश लोकांना दिला,आयुष्यभर बाबांनी नागरिकांना दशसूत्रीचा स्वीकार करावा अशी शिकवण होती. भुकेल्यांना अन्न, ताह्णनल्यांना पाणी,उघडयांना वस्त्र ,आणि निराधारांना आसरा हा उपदेश बाबांनी जीवनात जोपासला, जिवंत पणी माय बापाची सेवा करा, कार्मकाण्ड करू नका, व्याजाने पैसे काढून मोठे कार्य प्रसंग करू नये, जत्रा करू नका, धोंडा पुजू नये, जिवंत माणसातच देव आहे, अशा अनेक कार्याचा वैराग्याने जीवनात अंगीकार केला, अशा महान संतांची शिकवण समाजाला बरेच काही देऊन जाते .