विदर्भ

अमरावती जिल्हा व्यवसाय शिक्षकांचा विधानभवनावर धडकला एल्गार

नागपूर – २७ डिसेंबर रोजी विधानसभेवर अमरावती जिल्हा व्यवसाय शिक्षकांचा विविध मागण्यासाठी धडक एल्गार मोर्चा काढण्यात आल, व्यवसायी शिक्षण योजने ची आजपर्यंतची प्रलंबित आढाव बैठक घेऊन शालेय शिक्षण मंत्री यांनी शिक्षण व्यवस्था जाऊन घेतली , मागील ७ वर्ष पासून व्होकेशनल ट्रेंड प्रोव्हायडर व लॅन्ड ले हॅण्ड इंडिया च्या नफे खोरी गुलामगिरी आणि शिक्षणाचे बाजारीकरण चे सर्व पुरावे शिक्षण मंत्र्याजवळ जवळ देण्यात आले. राज्यात एकूण ८ ते १० हजार समग्र शिक्षण अभियान चे कर्मचारी कार्यरत असून त्यांच्यात व्यवसायी शिक्षक ची गणना झाली नसून. व्होकेशनल ट्रेंड प्रोव्हायडर माध्यमातून १२०० व्यवसायी शिक्षक वेळगे असून यांची अजूनपर्यंत बैठक झाली नसून, या शिक्षकांना अजून पर्यत १० टक्के वाढ सुद्धा मिळाली नाही . स्वशिक्षण संघाचा या मागणीला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ चौकशीचे आदेश देऊन ज्यांनी सी एस आर फंड चा घोटाळा केला, शिक्षकाची आर्थिक फसवणूक केली असेल, त्यांचे वर गुन्हे दाखल करण्यात येईल, आणि या पूर्ण सी एस आर फंड ची पूर्ण चौकशी करण्यात येईल, हि योजना ज्या शिक्षण संस्था चालवतात मागच्या ७ वर्षात त्यांच्या पगारात एकही रुपयांची वाढ झाली नव्हती शिक्षक मंत्र्यांनी तात्काळ अधिकारी यांना आदेश देऊन २५ टक्के वाढ करण्याचे आश्वासित करण्यात आले. यावेळी राज्याचे व्यवसाय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष् शोभराज खोंडे, सहसचिव महाराष्ट्र राज्य रोहिणी उमक, अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कमरूल अरेफैन . सहसचिव प्रवीण वैराळे , कार्याध्यक्ष शीतल अटलकर , उपाध्यक्ष प्रदीप तायडे आणि मोट्या संख्येने शिक्षक आणि संघटना प्रतिनिधी, यांचेसह अनेक पधाधिकारीं उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment