कोंकण महाराष्ट्र

आणि तेव्हापासून राणे लोकसभेची पायरी चढले नाहीत

सिंधुदुर्ग- खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. नारायण राणे यांच्या पीएनए अनेकांना गंडा घातला. यानंतर मोदींनी त्यांना चांगला दम भरला. तर केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर देणाऱ्या राणेंची फजिती झाल्यानंतर त्यांनी आजपर्यंत लोकसभेची पायरी चढलेली नाही. असे सांगताना उदय सामंत यांची डिग्री बोगस असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमात खासदार विनायक राऊत बोलत होते. याप्रसंगी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले नारायण राणे यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे यांना दम भरला. आधी या सचिवाला काढून टाका अन्यथा तुमचे खाते काढून घेतले जाईल असा थेट दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना दिल्याचे विनायक राऊत यावेळी म्हणाले. तसेच नारायण राणे हे एकदा लोकसभेत बोलताना केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर देत होते. केरळच्या खासदाराने इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला. यांनी हेडफोन लावला होता. हेडफोन मध्ये हिंदी मध्ये काय सांगितलं हे यांना समजले नाही. आधीच यांना मालवणी धड बोलता येत नाही. मराठी देखील ते नीट बोलत नाहीत. फडणवीस शब्दाचा त्यांना साधा उच्चार करता येत नाही. यांच्या हिंदीचा तर पत्ताच नाही. त्यामुळे हेडफोन मध्ये काय सांगितले गेले हे त्यांना समजले नाही. हे उभे राहिले आणि केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर देऊ लागले.

यावेळी त्यांची चांगलीच फजिती झाली. मात्र त्या घटनेनंतर आजपर्यंत हे लोकसभेची पायरी चढलेले नाहीत. अशी टीका राऊत यांनी केली. लोकसभेच्या कारकिर्दीत प्रश्नोत्तराच्या वेळी आपण एकदा तरी उभे राहिलात का असा प्रश्न देखील नारायण राणे यांना त्यांनी केला. जिल्हा वाशियांना तरी सांगा एमएसएमई या शॉर्ट फॉर्म चा फुल फॉर्म, कळलच नाही तर काय सांगणार असे देखील यावेळी विनायक राऊत म्हणाले. जिल्ह्यात शिवसेना वाढत आहे ते एका मंत्र्याला शोभत नाही म्हणून सात सात मंत्री या जिल्ह्यात राणे घेऊन येतात असी टीका देखील राऊत यांनी यावेळी केली.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा देखील जाऊ त्यांनी यावेळी समाचार घेतला. उदय सामंत यांची डिग्री बोगस असल्याचे पुरावे भाजपानेच मीडियाला दिले असे ते म्हणाले. आधी अब्दुल सत्तार यांना आडवे केले. संजय राठोड यांना भाजपाने सोडले नाही. आता उदय सामंत यांची पाळी आहे. असे सांगतानाच उदय सामंत यांनी ठाकरे शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्याला किंवा सरपंच झाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा बांधकाम क्षेत्रातला घोटाळा आणि डांबरातला काळाबाजार आम्ही कधीही उघड करू शकतो असा इशारा देखील राऊत यांनी यावेळी दिला. शिंदे सरकारचं आउट घटकेचे राजकारण दोन ते तीन महिने झाले त्यानंतर त्यांचा विसर्जन भारतीय जनता पक्षच करेल असे भाकीत यावेळी विनायक राऊत यांनी केले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment