कोंकण महाराष्ट्र

अनिल परब यांना दापोली न्यायालयाकडून जामीन मंजूर

रत्नागिरी – कोकणात दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून पर्यावरणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात उद्धव ठाकरे यांचे उजवेहात अनिल परब याना तूर्तास दिलासा मिळाला आहे. याविषयी सुरू असलेल्या खटल्यात दापोली कोर्टात उपस्थित राहण्याविषयी अनिल परब यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. विधान परिषदेचे आमदार अनिल परब व साई रिसॉर्टचे सदानंद कदम हे दापोली न्यायालयात १२ जानेवारी रोजी गुरुवारी हजर झाले. यावेळी त्यांना दापोली न्यायालयाने पंधरा हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.

भाजपाचे माजी खासदार व नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने आरोप केलेले साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली दापोली न्यायालयात पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा सुरू आहे. येथील नियमित फौजदारी केस नंबर १२/२०२२ या केस मध्ये आरोपी क्रमांक एक अनिल परब व आरोपी क्रमांक दोन सदानंद कदम हे आज रोजी कोर्टात प्रत्यक्ष हजर होते. त्यांचा प्रत्येकी १५०००/- रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे. पुढील तारीख २३ फेब्रुवारी २०२३ अशी ठेवण्यात आली  आहे. पुढील तारीख दोषारोप पूर्व सुनावणीसाठी हा दावा सुरू आहे. अशी माहिती केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाचे वकील एड. प्रसाद कुवसेकर यांनी दिली आहे.

नियमांची फॅमिली करून बेकायदा हे साई रिसॉर्ट उभारण्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी वारंवार केला आहे. याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण खात्याकडेही सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती, या रिसॉर्टवर कारवाई व्हावी यासाठी किरीट सोमय्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. दरम्यान यापूर्वीच अनिल परब यांनी आपला साई रिसॉर्ट जवळ कोणताही संबंध नसल्याची माहिती परब यांनी दिली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment