पश्चिम महाराष्ट्र

लंपी रोगामुळे साताऱ्यात सहा जनावरांचा बळी

सातारा – जिल्ह्यातील २२९ गावांमध्ये लंम्पी स्किन रोगाची लागण झाली आहे. आज अखेर १८ हजार ३४६ जनावरांस लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रविवारी आणखी ६ जनावरांचा मृत्यू झाला असून आज अखेर १२३३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. नियमित औषधोपचाराने १२ हजार २१ जनावरे बरी झाली आहेत. मृत जनावरे पडलेल्या पशुपालकांना शासनाकडून गतीने मदत दण्यात येत असून ९१३ पशुपालकांच्या बॅंक खात्यावर मदत जमा करण्यात आली आहे. उर्वरित पशुपालकांनाही लवकरच मदत देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment