विदर्भ

रुग्णालयाच्या शौचालयात आढळले मृत अर्भक, चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ

चंद्रपूर – उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील शौचालयाच्या सीट मध्ये दोन ते अडीच महिन्याचे मृत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सफाई करताना सफाई कामगारांना मृत अर्भक आढळलं. मृत अर्भक पुरुष जातीचे आहे.

उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील एका शौचालयाच्या सीट मधून पाण्याचा निचरा होत नव्हता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सफाई कामगार यांना पाहण्यासाठी पाठविले. सफाई कामगाराने सीट मधून पाणी जात नसल्याने लोखंडी सळाख टाकून बघितले असता त्या सळाखीला लागून अंदाजे दोन ते अडीच महिन्याचे नाळ न कापलेले पुरुष जातीचे अर्भक बाहेर आले. ही माहिती सफाई कामगार यांनी लगेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती राजुरा पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी मृत अर्भकाचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतलेत. रुग्णालयात ही घटना घडली असताना कुणालाच याची माहिती झाली नसल्याने रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असताना अर्भक आले कुठून ? ते अर्भक शौचालयाच्या सीट मध्ये टाकून कोण गेला ? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. दरम्यान राजुरा पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध भादंवि कलम ३१५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष दरेकर व उप पोलीस निरीक्षक वडतकर करित आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment