सिंधुदुर्ग – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला “शिका आणि संघटित व्हा” असा मंत्र दिला . ह्या मंत्राची तत्कालीन गरज होतीच मात्र त्याची गरज आजही आहेच. त्यामुळे समाजातील सर्वांनीच ” शिका आणि संघटित व्हा ” याचा अंमल करून समाज उन्नती साधयला हवी , असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी केले.
ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन , कोकण रेल्वे कणकवली विभाग यांच्यावतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिन अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. संघटित होण्याची आजही गरज असून , संघटित होऊनच अन्यायाविरुद्ध प्रतिकार करता येतो , म्हणून बाबासाहेबांची शिकवण आजही अंगीकारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कणकवली रेल्वे स्थानकात आयोजित या कार्यक्रमात अशोक करंबेळकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तर विजय गावकर यांनी भगवान बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला . कोकण रेल्वेचे अभियंता सुरेश फडके यांनी दीप प्रज्वलन केले. “शिका आणि संघटित व्हा” हा महामंत्र बाबासाहेबांनी केवळ ठरावीक वर्गालाच दिला नव्हता तर तो सर्वच अन्यायग्रस्त लोकसमूहासाठी होता. बाबासाहेबांच्या अमूल्य विचारांचे पालन करणे, हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन ठरेल असे मत पत्रकार विजय गावकर यांनी यावेळी व्यक्त केले. या अभिवादन कार्यक्रमात कोकण रेल्वेचे अभियंता सुरेश फडके , बौद्ध उपासक संदेश तांबे , उपासक एम पी जाधव , संतोष कदम , संतोष बापट आदींनी बाबासाहेबांच्या प्रति अभिवादन प्रकट केले . कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर , पत्रकार विजय गावकर ,यांच्यासह बौद्ध उपासक संदेश तांबे , उपासक एम पी जाधव सर , कोकण रेल्वेचे अधिकारी अंकुश कुमार , अभियंता सुरेश फडके , संतोष कदम , संतोष बापट , महेश दळवी , चंदन गुरव , जे बी कदम , संजय कदम , जयपाल कांबळे , प्रवीण जाधव , दीपक तांबे, भाई परब , प्रमोद मुंडे ,अनिकेत मसुरकर ,अनिल तांबे ,रवी जाधव , आकांक्षा तांबे , पुष्पा नेमळेकर , निशा गावडे , श्रुती निपाणीकर आदि कोकण रेल्वेचे कर्मचारी उपस्थित होते.