मनोरंजन

अखेर श्रेयस तळपदे या व्यक्तीसमोर झुकला


मला हात लावायची हिंमत कुणाच्यात तरी आहे का असं म्हणत कॅमेरासमोर आत्मविश्‍वासाने उभा असलेला अभिनेता श्रेयस तळपदे . त्याच्या समोर आलेली एक व्यक्ती बघून त्याची बोबडीच वळली आणि त्याला झुकावं लागलं .लोकप्रिय सेलिब्रिटी .. लाखोंच्या घरात फॅन फॉलोइंग … सध्या गाजत असलेली माझी तुझी रेशिम गाठ या मालिकेतील यश या भूमिकेला मिळणारा तुफान प्रतिसाद एवढं सगळं पायाशी लोळण घेत असतानाही श्रेयस तळपदेला कुणासमोर झुकावं लागलं या प्रश्नाचे उत्तर श्रेयस तळपदेने एक गमतीशीर व्हिडिओ मधून त्याच्या चाहत्यांना दिले आहे . ज्या व्यक्ती समोर श्रेयस झुकला ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ज्या अभिनेत्याला त्याने मराठी आवाज दिला आहे तो पुष्पराज म्हणजेच अभिनेता अल्लू अर्जुन हा होता.

श्रेयस तळपदेने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भीतीने त्याची प्रकृती बिघडलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये   श्रेयस तळपदे म्हणतो की, ‘मला हात लावण्याची कोणामध्ये हिम्मत आहे का?’व्हिडिओमध्ये ‘पुष्पा’ ची एण्ट्री होते आणि चित्रपटातील काही अॅक्शन सीन्स दिसतात.मला कळत नाही की हे लोक आपल्याकडे का येत आहेत.’ त्यानंतर अल्लू अर्जुनचा हिट अॅक्शन सीन आहे, ज्यात तो मारामारी करताना दिसतो. हे सगळं पाहून शेवटी श्रेयस बेशुद्ध पडतो.

अल्लू अर्जुनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात अभिनेत्याचा हिंदी व्हॉईस ओव्हर श्रेयारने केला आहे. अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेला शोभणाऱ्या या आवाजावर त्याला खूप प्रशंसा मिळाली. ‘ ‘पुष्पा, पुष्पराज… झुकेगा नही साला’ यासह अनेक संवादांनी प्रेक्षकांवर चांगलीच जादू केली आहे.
बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे सध्या खूप चर्चेत असतो. याचं मुख्य कारण म्हणजे अल्लू अर्जुन च्या ‘पुष्पा: द राइज सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयसने आवाज दिला. त्याचा दमदार आवाज लोकांना प्रचंड आवडला. तेव्हापासून श्रेयसच्या लोकप्रियतेत पुन्हा एकदा वाढ झाली. 

ओम शांती ओम गोलमाल इकबाल हिंदी अशा हिंदी सिनेमा बरोबरच मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये मोस्क पण लोकप्रिय काम करणाऱ्या श्रेयसची सध्या माझी तुझी रेशीमगाठी मालिका सर्वांनाच खूप आवडत आहे या मालिकेतील श्रीमंत घरातील अत्यंत सोज्वळ तरुण ही भूमिका असणे लीलया पेलली आहे या मालिकेतील आणि प्रार्थना बेहरे यांचे रोमँटिक सीन ही या चाहत्यांना खूप आवडतात .

पुष्पा या सिनेमाच्या हिंदी वर्जन मध्ये अल्लू अर्जुन ला आवाज देणाऱ्या श्रेयस ने या सिनेमातील संवादांना काही मराठी तडका ही दिला आहे . जसजशी पुष्पाची लोकप्रियता वाढेल तसतसा श्रेयस च्या फॅन्स मध्ये देखील वाढ होत आहे . श्रेयस च्या मनावरही पुष्पाचे गारूड किती आहे हे त्याने या व्हिडीओमधून दाखवून दिले . त्याच्या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांकडून कमेंट चा वर्षाव होत आहे .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment