अमरावती – नागपूर येथील विधानभवनात १९ डिसेंबर पासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होते. अखेर ३० डिसेंबर रोजी अधिवेशनाची सांगता झाली. तब्बल ११ दिवस चालले हिवाळी अधिवेशन. राजकीय रिंगणात आधीपासूनच हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची होती कुजबुज कानावर होती. आणि ते भाकीत खरे सुद्धा ठरले , सत्राच्या पहिल्याच दिवसापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाला घेऊन विरोधकांनी राज्यकर्त्यांना चांगलेच धारेवर धरले होते , विरोधीकडे भरपूर मुद्दे असल्याने अधिवेशनात मांडायला जणू काही कंबरच कसली होती, अशी अनुभूती या अधिवेशनातून आली.
राज्यपाल यांनी महापुरुषांचा अपमान केल्याच्या वक्तव्यापासून राज्यपाल हटावो पर्यंत ते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने जनतेच्या आक्रोश मुळे माफीनामा मागेपर्यंत, राज्यकर्त्यांची पडता भुई केलि होती. सोबतच अतिवृष्टी मुळे झालेली नापिकी, शेतीची नुकसान भरपाई , पीकविमा कंपनी कोणतीही भरपाई नसणे ,बेरोजगारी , महागाई , इतपर्यंत विरोधकांनी राज्यकर्त्यांची चांगलीच पंचायत केली होती. तसेच जनतेमधून वेगवेगळ्या संघटना , कर्मचारी ,वेगळे विदर्भ राज्य, समाजकार्य विध्यर्थी मोर्चा, शेतकऱ्याचे आंदोलने तसेच वारकरी समुदाय यांचे निवेदन, यांचे धडक मोर्चे काढण्यात आले यामुळे हे हिवाळी अधिवेशन चांगलेच वादळी झाले. सत्ताधारी आणि विरोधी यांनी एकमेकांवर चांगलेच आरोप प्रत्यारोप करण्यात आले, राज्यकर्त्यानी सुद्धा तेवढेच समर्पकपने उत्तर देऊन अधिवेशन काळात कामे मंजूर करून घेत अखेर अधिवेशाची सांगता करण्यात आली .