फी भरली नाही म्हणून….
विदय़ापीठ हायस्कूलमधून उषा व मीना यांचे नाव कमी केल्याचा निरोप माईंना पाठवला. लतादीदी शाळेत विचारायला गेल्या तेव्हा फी भरली नसल्याने त्यांचे नाव कमी केल्याचे सांगितले.
लतादीदी काही न बोलता तेथून आल्या. मागे काही वर्षापूर्वी विदय़ापीठ हायस्कूलच्या निधीसाठी शाळेच्या व्यवस्थापनाने लतादीदींशी संपर्क केला होता तेव्हा लतादीदींनी शाळा व्यवस्थापनाला त्या दिवसाची आठवण करून दिली.
दीदींनी निधी दिला पण आजही त्या वर्षाचे रेकॉर्ड काढून बघा जिथे फी भरली नसल्याने माझ्या बहिणींचे नाव कमी करत असल्याची नोेंद असल्याचे दाखवून दिले.
मीना व उषा यांचे शिक्षण थांबल्याचा तो दिवस दीदी विसरू शकल्या नाहीत