कोंकण महाराष्ट्र

खडवलीत बांधकाम व्यावसायिकावर हल्ला

टिटवाळा : टिटवाळा पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. नुकतेच टिटवाळा पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या खडवली नडगाव येथील बांधकाम व्यावसायिक शैलेश लोणे(नडगाव) यांच्यावर खंडणीसाठी जिवघेणा हल्ला करण्यात आला असून सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. दरम्यान या सर्व प्रकारानंतर टिटवाळा पोलीस ठाण्यात कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपींवर ३२६ कलम सुद्धा लावण्यात आले आहे, अशी माहिती मनसेचे पदाधिकारी दिनेश बेलेकर यांनी दिली आहे.

याबाबत फिर्यादी कडून सांगण्यात आले की हल्लेखोरांपैकी मुख्य आरोपी सागर चौधरी (दानबाव), अमन लोणे(नडगाव), शेखर मगर, अभिषेक भंडारी, महेश देसले आणि इतर सहकारी यांनी पिस्तूलाचा धाक दाखवत शैलेश यांच्याकडे बांधकाम चालू ठेवायचे असेल तर दरमाह ५० हजार द्यावे लागती अशी मागणी केली. परंतु शैलेश लोणे हे स्थानिक असल्यामुळे त्यांनी खंडणीची मागणी फेटाळून लावली तेव्हा आरोपींनी शैलेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्या दिवसापासून आरोपी सागर, अमन आणि इतर सहकारी आपल्या १७१७ आणि १४३ क्रमांकाच्या चारचाकी गाड्यांमधून  फिर्यादीचा पाठलाग करत असत. दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी देखील आरोपींनी फिर्यदीचा पाठलाग केला आणि टिटवाळा शेजारील जयमल्हार धाब्यावर फिर्यादी जेवणासाठी थांबताच त्याच्यावर आपल्या ईतर सहकार्याच्या सोबत, लोखंडी रॉड, फायटर, लाकडी दंडुके यांनी जिवघेणा हल्ला केला. हा संपूर्ण थरारक प्रकार धाब्यातील CCTV कॅमेरॅत कैद झाला आहे. या हल्ल्यात फिर्यादीला जबर इजा झाली असून, डोक्यात टाके आणि हाताला फ्रॅक्चर झाले आहे. 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment