पुणे – आपल्या राहणीमान आणि पैश्याचा माज असलेल्या लोकांची अनेक उदाहरण पाहिल असेल. त्याचसोबत आपण कोणते हाय प्रोफाइल गॅजेट्स, मोबाईल व गाड्या वापरतो यावरून लोकांची अपेक्षा असते की आपल्याला इतरांनी आधार व दर्जाची वागणूक द्यावी, असे असताना अनेक लोकांना त्याचा माज असतो. अशीच एक घटना पुण्यातील डेक्कन परिसरात घडली. एका वकिलाने बहुप्रतिष्ठ गाडी म्हणजे ऑडी चालका एका पत्ता विचारल्या मुळे वकिलाला बेदम मारहाण केली. तुला कळत का कोणाला प्रश्न काय विचारतो ते असा बोलून त्या वकिलाला बेदम महारहान करण्यात आली.
याप्रकरणी विशाल शंकर सोनवणे (४२) यांनी डेक्कन पोलिसात तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी डेक्कन परिसरातील उभे असताना एका व्यक्तीला ज्ञानमुद्रा टिटोरियल क्लासचा पत्ता विचारला होता. याचा राग मनात धरून ऑडी गाडी (एम एच १४ आर एफ ६६८५) चालकाने “तुम्हाला समजते का, तुम्ही कोणाला पत्ता विचारत आहात, आम्ही ऑडी चालवणारे लोक आहोत” असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. इतकंच काय तर त्याने गाडी कार वेगाने घेऊन जात असताना गाडीचे चाक फिर्यादींच्या पायावरून गेले. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.