पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरातील हॉटेलमध्ये लावलं औरंगजेबाच्या वंशजाचे पोस्टर

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील राजारामपुरीमधील ‘बिर्याणी बाय किलो’ या बिर्याणी हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजांचे पोस्टर्स लावण्यात आल्याने वाद झाला. कोल्हापूर शहरातील राजारामपुरीमधील ‘बिर्याणी बाय किलो’ या बिर्याणी हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजांचे पोस्टर्स लावण्यात आल्याने वाद झाला. बिर्याणी हाऊसमध्ये पोस्टर दिसल्यानंतर हॉटेलमध्ये घुसून काही तरुणांनी पोस्टर रस्त्यावर आणून फाडले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार बहादूर शाह जफर या एका मुघलाचा फोटो लावण्याने वाद निर्माण झाला.

तरुणांकडून जाब विचारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर हॉटेल कर्मचारी आणि तरुणांमध्ये वादावादी झाली. दुसरीकडे कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये लावण्यात आलेला फोटो औरंगजेबाचा असल्याचा संदेश व्हायरल झाला होता. मात्र, लावण्यात आलेले पोस्टर औरंगजेबचे नसून तो शेवटचा मुघल सम्राट तसेच उर्दू कवी होता अशी माहिती समोर आली आहे. मात्र, एका मुघलाचा फोटो हॉटेलमध्ये लावण्यात आल्याचा समज करून घेत तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून पोस्टर फाडले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment