मनोरंजन

अवतार टू पाहून समीक्षक थक्क, जेम्स कॅमरुनला ठोकला सलाम

अवतार टू हा सिनेमा १६ डिसेंबरला जगभरात प्रदीप प्रदर्शित होतोय. नुकताच लंडनमध्ये हा सिनेमा खास ठेवण्यात आला होता. समीक्षक आणि पत्रकार हा सिनेमा बघून थक्क तर झालेच पण अवतार टू पाहून दिग्दर्शक जेम्स कॅमरुनला सलामही केला अवतार टू च्या रिव्ह्यूला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे .

हटके विषय . जबरदस्त सादरीकरण आणि नजर खिळवणारी तांत्रिक कमाल यामुळे अवतार या सिनेमाचा पहिला भाग पसंती उतरला होताच, आता १६ डिसेंबरला अवतार टू हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होणार आहे. नुकताच लंडनमध्ये समीक्षक आणि प्रसार माध्यमांसाठी या सिनेमाचा खास आयोजित केला होता. यावेळी समीक्षक हा सिनेमा पाहून थक्क झाले. त्यांनी केलेला रिव्ह्यू सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. इतकच नव्हे तर दिग्दर्शक जेम्स कॅमरूनचही भरभरून कौतुक होताना दिसतय .

अवतार सिनेमाचा पहिला भाग खूप गाजला होता आता. अवतार टू कधी येणार याकडे गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे लक्ष लागलं होतं. प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून १६ डिसेंबरला अवतार टू पाहण्याची संधी मिळते. या सिनेमाचा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्पेशल इफेक्ट. लंडनमध्ये झालेल्या खास शो मध्ये समीक्षकांनाही या व्हीएफएक्स तंत्राने भुरळ घातली. अशा प्रकारचे सिनेमे बनवणाऱ्या इतर निर्माता आणि दिग्दर्शकांनी जेम्स कडून काहीतरी शिकावं असा खास शेरा ही समीक्षकांनी दिला आहे .

समीक्षक एरिक देव्हीस यांनी त्यांच्या ट्विटरवर लिहिले की मला हे सांगताना खूप आनंद होतोय की हा सिनेमा अभूतपूर्व आहे. अवतारच्या पहिल्या भागापेक्षा अवतार टू भव्य झालाय शिवाय यातील भावनिक प्रसंग देखील खूप छान गुंफण्यात आलेत. सिनेमा मांडण्याची एक उत्तम पद्धत यामुळे समोर आली आहे. सिनेमा प्रेक्षणीय बनवण्याची ताकद जेन्सकडे आहे .

ड्यु टेलर यांनी म्हटलं आहे की अवतार द वे ऑफ वॉटर हा सिनेमा सर्व स्तरावर छान झालाय. बऱ्याच दिवसांनी जेन्सला पाहून आनंद झाला. या सिनेमातील इफेक्ट तर चांगला आहेच पण सिनेमातील पात्र त्यांचा लूक आणि भावनिक धागा यांनीही बाजी मारली आहे.

अवतार टू हा सिनेमा भारतातही सोळा डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हिंदी इंग्रजी सह तमिल तेलुगु कन्नड आणि मल्याळम या भाषेत अवतार टू चित्रपटगृहात दाखल होतोय. पहिला शो सोळा डिसेंबरच्या मध्यरात्री सुरू होईल आणि अनेक थिएटर्स मध्ये २४ तास सुरू राहणार आहे .दोन हजार कोटी इतक्या तगड्या बजेटमध्ये हा सिनेमा बनवण्यात आलाय. सिनेमा अजून प्रदर्शित झाला नाही तोपर्यंतच दहा कोटी रुपयांची तिकीट ऍडव्हान्स बुकिंग झाली आहेत. या सिनेमाची चर्चा पाहता आज पर्यंतच्या हॉलीवुड मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरेल असे दिसत आहे.

अवतार सिनेमाचा पहिला भाग २००९ ला प्रदर्शित झाला होता आणि त्याने अनेक रेकॉर्ड सोडले होते. तेरा वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल आला आहे. जेम्स कॅमरून याने या सिनेमाचा तिसरा चौथा आणि पाचवा भाग दोन दोन वर्षाच्या अंतराने प्रदर्शित करण्याचे नियोजन केला आहे. त्यामुळे अवतार प्रेमींना भरगच्च पर्वणी मिळणार हे नक्की.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment