हिंगणघाट – वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पवनी या गावातील उच्च प्राथमीक शाळेतील शिक्षकांनी केला शाळेचा कायापालट. शाळेला डीजीटल बनवुन तसेच रंगरंगोटी करुन वॉटर फील्टर आरो ची केली सुविधा, कंप्युटर, प्रोजेक्टर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहे. शिक्षक विजय लीचडे यांना वर्धा जिल्ह्यात आदर्श शिक्षक म्हनून पुरस्कार सुध्दा भेटला आहे. या छोट्याशा गावातील शाळेचा कायापालट शिक्षकांनी मेहनत घेऊन केला. पवनी या छोट्याशा गावात एक ते सात वर्गापर्यत शाळा आहे मात्र जिल्ह्यात या शाळेला विशेष ओळख असून जिल्हाभर आदर्श शाळा म्हणून ओळखली जात आहे.