विदर्भ

कारला येथे बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे बॅनर जाळले

चांदूर – रेल्वे तालुक्यातील कारला येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे बॅनर अज्ञात समाजकंटकांनी जाळले असून दोषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

नुकतीच क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी झाली असून कारला या गावात जयंतीनिमित्त बॅनर लावण्यात आले होते. मात्र सदर बॅनर अज्ञात लोकांनी जाळल्याची घटना घडली आहे. यासंबंधी गावकऱ्यांनी कुऱ्हा येथील पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली आहे. परंतु समाजकंटकाविरोधात कारवाई न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. तर संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment