पश्चिम महाराष्ट्र

बारामती आरटीओने महसूल वर्षातील वार्षिक उद्दिष्ट मुदतीपूर्वीच केले पूर्ण

बारामती – बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २०२२-२३ या महसूल वर्षातील वार्षिक उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण केले आहे. विशेषतः उद्दिष्टा पेक्षा ही जास्तीचा महसूल मिळविला आहे. सन २०२२-२३ या महसुली वर्षात नोव्हेंबर २२ पर्यंत ११९. २३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. मात्र बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाने मुदतीपूर्वीच १०२ कोटींचा टप्पा पार केला आहे. म्हणजेच सरासरी १२७% महसूल मिळविला आहे. तसेच परिवहन विभागाच्या वायु पथकाला ३ पूर्णांक ५० कोटींचे उद्दिष्ट असून ३ पूर्णांक २३ कोटींचा महसूल आज अखेर मिळविला आहे ..त्याची सरासरी सुमारे १४०% इतके आहे….अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी दिली..

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची बारामती येथे २००३ साली स्थापना झाली आहे. तेव्हापासून आज पर्यंत या कार्यालयात ५ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. पैकी ५० हजार व्यावसायिक वाहनांचा त्यात समावेश आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे महाराष्ट्रातील पहिले आयएसओ मानांकन प्राप्त कार्यालय आहे.. या कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकांची एकूण १० पदे असून पैकी ५ मोटार वाहन निरीक्षक कार्यरत आहेत. तरीही या कार्यालयातील कामकाज सुरळीतपणे चालू आहे..

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दैनंदिन कामकाजात शून्य प्रलंबितता आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी मदत कक्ष स्थापण्यात आला आहे. कर्मचारी या माध्यमातून कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नागरिकांना मार्गदर्शन करतात.तसेच या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शाळा व महाविद्यालयांमध्ये वेळोवेळी रस्ता सुरक्षितेच्या दृष्टीने प्रबोधनपर कार्यक्रम राबविले जातात.. त्यासाठी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.या कार्यालयाकडील इंटरसेप्टर वाहनाद्वारे महामार्गावरील अति वेगाने धावणाऱ्या वाहनांवर वचक बसविला जात आहे..

या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दहा साखर कारखाने आहेत या कारखान्याचे संचालक व अधिकारी यांच्याशी वेळोवेळी बैठक घेऊन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येते.शून्य अपघात प्राप्त करण्याच्या दृष्टीने या कार्यालयाकडून सर्वतोपरी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या अवैद्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्लीज जात आहे अशी नियमित कारवाई केली जात आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी दिली..

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment