विदर्भ

बसपाच्या एका मतावर धुळे मनपाच्या उपमहापौर पदी भाजपा

धुळे – महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपाचे नागसेन बोरसे यांची निवड झाली आहे. ही निवडणूक प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या देखरेखी खाली पार पडली, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भाजपचे नागसेन बोरसे यांच्या विजयाची घोषणा केल्यानंतर सर्व नगरसेवक आणि बोरसे यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी धुळे मनपाच्या आवारात विजयोत्सव साजरा केला.

धुळे मनपाच्या उपमहापौरपदी भाजपचे नागसेन बोरसे यांची निवड झाली. त्यांना या निवडणूक प्रक्रियेत ५० मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार तथा अपक्ष नगरसेवक मोमीन आसिफ इस्माईल यांना २० मते मिळाली. निवड प्रक्रियेत बसपच्या एकमेव नगरसेविकेने भाजपचे नागसेन बोरसे यांना आपले मत दिले. या उपमहापौर निवड प्रक्रिया दरम्यान तीन नगरसेवक गैरहजर होते, धुळे महापालिका सभागृहात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक प्रक्रिया झाली.

भाजपचे नागसेन बोरसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मोमीन आसिफ इस्माईल व एमआयएमचे नगरसेवक सईद बेग यांचे अर्ज छाननीत वैध ठरले. त्यानंतर सईद बेग यांनी माघार घेतली, त्यामुळे भाजप चे नागसेन बोरसे व मविआ चे उमेदवार मोमीन आसिफ रिंगणात होते. या निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक नगरसेवकाने हात उंचावत मतदान करायचे होते. या निवडणूक प्रक्रियेत भाजपचे नागसेन बोरसे यांना ५० मते मिळाली. त्यात बसपच्या एका मताचा समावेश होता. मोमीन इस्माईल यांना २० मते मिळाली.

भाजपने दिलेल्या संधीचे सोने केले जाईल आणि जे जे कामे अपूर्ण असतील ते सर्वच कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तसेच विकास कामांना सहकार्य असेल धुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू केलेली लढाई पुढेही सुरूच राहील. कारण आम्ही भ्रष्टाचार खपवत नाही. अशी प्रतिक्रिया नागसेन बोरसे यांनी यावेळी दिली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment