राजकारण

भाजप प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे; मुंबई अध्यक्षपदी पुन्हा आशीष शेलार; उद्धव यांना पालिका निवडणुकीत धक्का देण्याची रणनीती

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यावर भाजपने संघटनात्मक पातळीवर बदल करताना प्रदेशाध्यक्षपदी माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर मुंबई अध्यक्षपदी आमदार आशीष शेलार यांची शुक्रवारी नियुक्ती केली. मुंबई महानगरपालिका जिंकून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याचा निर्धार केलेल्या भाजपने शेलार यांच्याकडेच पुन्हा मुंबईची सूत्रे सोपविली आहेत.

भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तर मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने दोन्ही पदांवर नव्याने नियुक्त्या होणार हे निश्चित होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्षपदी नागपूरचे बावनकुळे, तर मुंबई अध्यक्षपदी शेलार यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नवी दिल्लीत केली. बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाने ओबीसी समाजातील नेत्याला संधी दिली आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान बावनकुळे यांच्यासमोर आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment