अमरावती – देशाचे प्रथम कृषिमंत्री तथा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुपुत्र स्व. डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा त्यांच्या जन्मदिनी दिनांक २७ डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनातर्फे शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी या मागणी करिता विदर्भ शेतकरी संघटना तसेच पॉवर ऑफ मीडिया यांच्या वतीने पापड येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी विदर्भ शेतकरी संघटनेचे तसेच पॉवरऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..