पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात जैन समाजाचा विराट मूक मोर्चा

कोल्हापूर – जैन समाजाचा आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित केल्याचा निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित केल्याचा निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले. जैन धर्मियांच्या धार्मिक स्थळांवर अतिक्रमण होत आहेत. या ठिकाणी काही निंदनीय प्रकार घडत आहेत, या सर्वांचा प्रतिबंध करावा यासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक मंदिरांचे अध्यक्ष महास्वामी समाजातील मान्यवरांचे उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. जैन धर्मियांच्या सर्व तीर्थक्षेत्रांना संरक्षण तसेच तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करत नाही तोपर्यंत जैन समाज धर्मात आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे. मोर्चानंतर केंद्र सरकारने जर मागणी मान्य केले नाही, तर टप्प्याटप्प्याने मुंबई येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोर्चाने जाऊन निवेदन देण्यात येईल.

झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून जैन धर्माचे पवित्र स्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला तीर्थक्षेत्र दर्जा राहावे यासाठी, अशी मागणी केली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment