कोंकण महाराष्ट्र

मुंबई गोवा महामार्गावर दुचाकीचा अपघात    

रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांच सत्र सुरू असून राजापूर येथे झालेल्या अपघातनंतर आता लांजा येथे दुसरा अपघात झाला आहे. या दोन्ही अपघातात दोन जणांचे जीव गेले आहेत. महामार्गावरील पाली पाथरट उभी धोंड येथे काल शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुचाकीचा अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रदीप प्रभाकर धाडवे ( २५ रा.पाथरट,पाली) हा तरुण या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरण कामामुळे रस्त्यावर खड्डे व माती असल्याने अपघात घडत आहेत त्याकडे  सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्गाचे कंत्राटदार हे दुर्लक्ष करीत असल्याने असे अपघात घडत असून स्थानिक नागरिकांचे बळी जात आहेत. प्रदीप प्रभाकर धाडवे आपल्या कामानिमित्त रत्नागिरी येथे चालला होता यावेळी त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. हा अपघात महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे झाल्या प्राथमिक अंदाज आहे.

अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे, पोलीस नाईक राकेश तटकरी यांनी घटनास्थळी दाखल होऊन महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती ती  सुरळीत केली. धाडवे याच्या मृतदेहावर पाली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन आज अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रदीप याच्या अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. प्रतिभेच्या घरची परिस्थिती बेताची असून किरकोळ मूळ मजुरीचे कामधंदा करून तो आपला उदरनिर्वाह चालवत होता. या अपघाताची खबर अनिल धाडवे यांनी दिली असून अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्र येथे करण्यात आली असून अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे हे करीत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment