अमरावती – सावित्री बाई जोतीराव फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्यातील नायगाव येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. आणि हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तिदिन म्हणून साजरा केला जातो . २०१५ रोजी पुणे विद्यापीठाचे नामकरण सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले असून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाईची ओळख आहे.
आपल्या आयुष्यात सावित्री बाई फुले यांनी अविरत कार्य केले आहे, महिला शिक्षणाच्या पुरस्कर्त्या म्हणून सावित्रीबाईंनी महिला आणि मुलींच्या शिक्षणाकरिता नेहमी प्रयत्नशील होत्या, ज्योतिबा यांनी सुरुवातीला सावित्रिबाई ला शिकवले आणि नंतर सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८४८ साली पुणे येथील भिडे वाड्यात मुलींकरीता पहिली शाळा सुरु केली, त्याच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला, पण ते डगमगले नाही. अंगावर शेण आणि दगड झेलून सुद्धा त्यांनी साजकार्याचे काम चालूच ठेवले. त्यांनी समाजाला साक्षर व्हा, निर्भय व्हा , असा संदेश दिला. समाजातील वाईट रूढी परंपरांना त्यांनी विरोध केला. स्त्री जीवनात क्रांती घडवणाऱ्या ज्ञानज्योत प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले याना महाराष्ट्र माझा तर्फे कोटी कोटी नमन.