पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

वाढदिवसाच्या दिनी सरपंच पत्नीची जेसीबीतून मिरवणूक

खेड(पुणे): राजकारण म्हंटले की कोणी काहीही करायला तयार होते. अनेक उदाहरणे आपल्या समोर आहे. अशीच एक राजकीय उत्साह वाढवणारी घटना खेड तालुक्याच्या दावडी गावातून समोर आली आहे. दावडी येथील उद्योजक हिरामण खेसे यांनी पत्नी माधुरी खेसे यांची दावडीच्या सरपंचपदी वर्णी लागताच पतीने पत्नीला वाढदिवसाची अनोखी भेट देत जेसीबी मधून मिरवणूक काढून वाढदिवस साजरा केला. या मिरवणुकीची सद्या चर्चा वाढू लागली आहे.

दावडीच्या तत्कालीन सरपंच राणी डुंबरे पाटील यांनी त्यांच्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. यानंतर सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. मात्र यामध्ये एकमेव माधुरी खेसे यांचाच अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे सरपंच सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्या नंतर सरपंचाची गावातून वाजत मिरवणूक कडण्यात आली तर जेसीबी मधून भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला .

उपसरपंच अनिल नेटके , सदस्य संभाजी घारे , संतोष सातपुते , पुष्पा होरे, धनश्री कान्हुरकर ,राणी डुंबरे पाटील ,मेघना ववले,संगीता मैंद ,दत्तात्रय ओंबळे,उपस्थित होते. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी विजय घुगे ,तलाठी सतीश शेळके पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील ग्रामसेवक तान्हाजी इसवे यांनी काम पाहिले.

खेड तालुक्यातील दावडी येथे वाढदिवसाच्या निमित्ताने पतीची पत्नीला सरपंच पदाची अनोखी भेट दिली आहे. माधुरी खेसे यांची सरपंच पदी वर्णी लागली असून सरपंच निवडीनंतर गावातून वाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली तर जेसीबी मधून भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला. या मिरवणुकीची सद्या राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगू लागली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment