रत्नागिरी – जवळच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथून खेड तालुक्यात लाकूडतोडीसाठी आलेल्या एका इसमाचा खून झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जंगलतोडीसाठी जवळच्या रायगड जिल्हयातील माणगाव येथून आलेल्या एका लाकुडतोड्याचा त्याच्याच एका सहकाऱ्याने खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याबाबत त्या लाकुडतोड्याचा मृतदेह तब्बल एक महिन्यानंतर आंबवली – वरवली गावच्या दरम्यान असणाऱ्या घनदाट जंगल परिसरात अक्षरशः कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे . या प्रकरणी खून करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्या विरोधात खेड पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मध्ये आंबवली – वरवली या दोन गावांच्या दरम्यान असणाऱ्या जंगलात जंगलतोडीसाठी रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथून लाकुडतोड करणारे कामगार खासगी जंगलतोड करणाऱ्या कंत्राटदाराने मागवले होते.
दिनांक २६ डिसेंबर रोजी नेहमी प्रमाणे जंगलतोड झाल्यानंतर कामगारांमधील दोघा जणांमध्ये वाद झाला, त्यापैकी मंगेश गायकवाड या कामगाराचा मारहाणीत मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दुर्गम जंगलात टाकण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी काही स्थानिक ग्रामस्थांना कुजलेल्या अवस्थेत या कामगाराचा मृतदेह आढळल्या नंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन कामगारांमध्ये झालेल्या हाणामारीत त्याचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर खेड पोलीस ठाण्यात मंगेश गायकवाड या लाकुडतोड्याचा मारहाण करून खून केल्या प्रकरणी मारहाण करणाऱ्या त्या अज्ञात कामगारावर भा.दं. वि. कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित खुन्याला पकडण्यासाठी खेड पोलिसांनी आरोपीचा कसून शोध केला सुरू केला आहे.