वसई – पुष्पा चित्रपटातील चंदनाच्या तस्करी प्रमाणे वसईत चंदन तस्करीचे मोठे रॅकेट पकडले आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत वालीव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी एक मोठा कंटेनर भरून चंदन जप्त केला आहे. कांद्याच्या आड चंदन भरून उरणच्या न्हावा शेवा बंदरात हा कंटेनर जात होता. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून सध्या वन विभाग आणि पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे. तर दुसरीकडं आरोपींची चौकशी सुरू आहे. हे चंदन आंध्र प्रदेशातून भिवंडी मार्गे न्हावा शेवा बंदरात नेत असल्याचा माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे.