पश्चिम महाराष्ट्र

नगरपंचायतसाठी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

कोल्हापूर – जिल्ह्यातील ४३० ग्रामपंयतींसाठी मतदान सुरु असतानाच शाहूवाडी तालुक्यात मात्र, पूर्णत: सन्नाटा आहे. ग्रामस्थांनी शाहूवाडीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे शाहूवाडीतील मतदान केंद्रे मतदारांअभावी ओस पडली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शाहूवाडी ग्रामस्थांचा विविध माध्यमातून शाहूवाडी नगरपंचायत करावी या मागणीसाठी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानतंर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकीकडे चुरशीना मतदान होत असताना शाहूवाडी मात्र शुकशुकाट आहे.

राज्य सरकारकडून तालुका ठिकाणच्या गावांना नगरपंचायत देण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेतला होता. त्या निर्णयाने शाहूवाडी गावाला नगरपंचायत मंजूर असूनही कार्यवाही झालेली नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment