अर्थकारण

Budget 2022 Live: इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, सर्वसामान्यांची पुन्हा एकदा निराशा

Budget 2022 Live: इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, सर्वसामान्यांची पुन्हा एकदा निराशा

  • अशी असेल आर्थिक वर्ष २०२२-२३ ची करप्रणाली– ५ लाखांपर्यंत कोणताही कर नाही
  • – ५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के कर
  • – ७.५ ते १० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के कर लागणार
  • – १० ते १२.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागणार
  • – १२.५ ते १५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के कर लागणार
  • – १५ लाखांपुढच्या उत्पन्नावर पुढे ३० टक्के कर लागणार
  • हिरे, रत्नं यांच्यावरील सीमाशुल्क पाच टक्क्यांपर्यंत कमीकट आणि पॉलिश केलेले हिरे, रत्नं यांच्यावरील सीमाशुल्क पाच टक्क्यांपर्यंत कमी करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
  • Budget 2022: “राजाला जर…”; कर आकारणीसंदर्भात अर्थमंत्र्यांनी दिला महाभारताचा संदर्भ; श्लोकाचं विवेचन करत म्हणाल्या…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे. यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.

देशातल्या कर आकारणीबद्दल बोलताना सीतारामन यांनी महाभारतातल्या एका श्लोकाचा संदर्भ दिला आहे. आपल्या भाषणात सीतारामन म्हणतात, महाभारतातल्या शांतिपर्व अध्यायात कर आकारणीबद्दल लिहिलेलं आहे. राजाला जर कल्याण साधायचं असेल, तर धर्माने सांगितल्याप्रमाणे जो कर आहे तो वसूल करायला हवा.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment